मा. शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. संतोष भोसले साहेब यांची सोनावळे शाळेस अचानक भेट

 



मा. शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. संतोष भोसले साहेब यांची सोनावळे शाळेस अचानक भेट


      आज बुधवार दिनांक 7/07/2021 रोजी दुपारी ठिक 3:15 वा जिल्हा परिषद केंद्रशाळा सोनावळे येथे मा. शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. संतोष भोसले साहेब व जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री. सुभाष अप्पा घरत साहेब यांनी अचानक भेट दिली .

       सोनावळे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री. उल्हास घोलप सर व सोनावळे शाळेचे शिक्षक श्री. जोशी सर यांनी दोघांचे आदरपूर्वक स्वागत केले . शालेय कामी शाळेतील शिक्षक श्रीमती घिगे मँडम,श्रीमती बाबर मँडम व  श्री. काशिनाथ भोईर सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.विजय भोईर उपस्थित होते.

     श्री. भोसले साहेबांनी शाळेस भेट दिल्यानंतर सेतू अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे बँक खाते हे शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेत काढण्याची सूचना दिली.शालेय स्तरावरील अखर्चित रकमा परत करण्यासंदर्भात सांगितले. शालेय ग्रंथालयही साहेबांना आवडले . ग्रंथालयातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी नियमित वापर करण्यासाठी शिक्षकांनी दक्ष राहावे असे सांगितले.

     सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने आणि इतरही सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून शालेय भौतिक सुविधा विशेष करून बालभवन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी उभारलेले सभागृह पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले. सर्व शिक्षक स्वंप्रेरणेने काम करत आहेत हे पाहून शिक्षकांचे कौतुक केले.

     शाळेत राबविण्यात येणारी सायकल बॅंक हि संकल्पना त्यांना खूप आवडली. या सर्व भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेत आदरणीय केंद्रप्रमुख श्री. उल्हास घोलप सर यांचे सहकार्य व योगदान मोलाचे आहे त्यामुळे श्री. भोसले साहेब व श्री. सुभाष अप्पा घरत साहेब यांनी केंद्रप्रमुख श्री. उल्हास घोलप सर यांचे खूप कौतुक केले.

     जर शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी कल्पकता वापरली तर ग्रामिण भागातील शाळा भौतिक व शैक्षणिक दृष्ट्या सुसज्ज होतील .एकंदरीत शाळा व शालेय परिसर पाहून हमभी आपके ०७/०७ श्री. भोसले साहेब यांनी समाधान व्यक्त केले.

         ✍️शब्दांकन✍️

श्री. काशिनाथ भोईर सर

* केंद्र -सोनावळे*

**********

Post a Comment

0 Comments