जि. प . शाळा रास येथे साने गुरुजी बालसंस्कार शाळा बाह्य केंद्राचे उद्घाटन
शिक्षक कार्यसम्राट आमदार मा.श्री.कपिल पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साने गुरुजी बालसंस्कार शाळा बाह्य केंद्र रास, केंद्र नडगाव,ता.शहापूर,जि.ठाणे कोकण विभाग म्हणजे ठाणे जिल्हात प्रथमच सुरू करण्याचा मान शाळा व्यवस्थापन समिती व गृप ग्राम पंचायत हिव सदस्या सौ.कल्पना बांगारी यांचें पती श्री.कृष्णा जानू बांगारी यांना मिळाला . यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर बालसंस्कार केंद्राला महापुरुषांची पुस्तके वटपौर्णिमाच्या दिवशी सौ.ज्योती सुरेश विशे यांनी रास गावाला पुस्तके भेट दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त व कवी लेखक पडवळपाडा शाळेचे पदवीधर शिक्षक मा.श्री.विजय देसले सर यांनी सांगितले की,हे बालसंस्कार केंद्र लहानपणापासून चांगले संस्कार घडविण्यासाठी आहे . येथे महापुरुषांची पुस्तके वाचण्यासाठी दिली जातील.
जि.प.शाळा कासगाव मुख्याध्यापक व सुत्र संचालन मा.श्री.प्रकाश पडवळ सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले.तसेच शाळेचे सहशिक्षक श्री.कृष्णा मडके सर यांनी केंद्र उघडण्यासाठी परिश्रम व मनोगत व्यक्त केले.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष प्राथ. श्री.सुरेश विशे सरांनी तेथील ग्रामस्थ व सदर बालसंस्कार केंद्राचे अध्यक्षपद श्री.कृष्णा बांगारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तसेच या केंद्रामध्ये विविध प्रकारचे गाणी, गोष्टी खेळ शिकविले जातील.तसेच विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. .कोविडचे नियमांचे पालन करुन सदर बालसंस्कार केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

0 Comments