आजही असे अनेक गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना दरवर्षी नविन पुस्तक,वह्या,दप्तर क्वचितच मिळत असतील. या अशा विद्यार्थांच्या मनात मात्र शिक्षणाची ओढ किंबहुना जिद्द असते. अशा या गरिब व गरजु विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करत दरवर्षी प्रमाणे कु.ऋषिकेश विशे यांच्या १८व्या वाढदिवसानिमित्त सूमित्रा एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे व रोटरी क्लब ऑफ चेंबूर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाळा रास शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन, पट्टी, पेन्सिल,खोडरबर,पाटी ,खाऊ इ.वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सापगाव केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुख संघटना शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष मा.श्री.अरुण मडके सर होते.
कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्राम पंचायत हिव सदस्य सौ.कल्पना बांगारी, शिक्षक भारती ठाणे जिल्हा खजिनदार मा.श्री.नामदेव बांगर सर, जिल्हा अध्यक्ष (प्रा.) व शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश विशे सर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सहशिक्षक श्री.कृष्णा मडके सरांनी मेहनत घेतली
----------------------------------------------
कु.ऋषिकेश विशे यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्री.सुरेश विशे सर यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या गावी दहा फळ झाडांचे वृक्षारोपण केले.
---------------------------------------------
आज शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.सुरेश विशे सरांच्या हस्ते आपल्या मेहुण्याच्या दावखान्याचे उद्घाटन वासिंद येथे करण्यात आले.
----------------------------------------------
आज शिक्षक भारती ठाणे तालुका अध्यक्ष श्री.नामदेव बांगर सर यांनी किन्हवली येथे दोन हजार स्क्वेअर फूट घरांचा गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमा निमित्ताने केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष, ठाणे खजिनदार इ.उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐

0 Comments