शिक्षक भारती ऑनलाइन सभा (ठाणे व पालघर जिल्हा )

 




शिक्षक भारती ऑनलाइन सभा (ठाणे व पालघर जिल्हा )

गुरुवार दिनांक 1 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6:00 वाजता शिक्षक भरती संघटना ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा यांची संयुक्त ऑनलाइन  सभा माननीय कार्यसम्राट आमदार कपिल पाटील साहेब व प्राथ. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय नवनाथ गेंड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 प्रास्ताविक ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय सुरेश विशे सर यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील शेलार सर यांनी केले. सदर सभेमध्ये ठाणे व पालघर जिल्हाचे तालुका अध्यक्ष यांना प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.  सदर सभेत  खालील प्रश्न मांडण्यात आले. 1 विकल्प विपरीत  शिक्षक यांचा प्रश्न मार्गी लावणे संबंधी प्रश्न  श्री.धानके सर  2.श्री.अनिल जाधव सर यांनी सर्व शिक्षकांचा पगार एक तारखेला होण्यासंबंधी चा प्रश्न सादर केला. 3. प्रमोद सांबरे सर यांनी ग्रामीण भागामध्ये कोरोना लसीकरण संबंधी जनजागृती मोहीम राबवणे संबंधी चा प्रश्न उपस्थित केला 4. शहापूर तालुका अध्यक्ष मोगरे सर यांनी काही शिक्षकांचे पगार दोन महिन्यापासून बंद असल्याने ते तात्काळ सुरु करण्यात यावेत असा प्रश्न उपस्थित केला.  तसेच आदिवासी विभाग पालघर मध्ये पंधराशे रुपये प्रोत्साहन  भत्ता तर शहापुर मध्ये पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता आहे ही तफावत दूर करण्यात यावी असा प्रश्न उपस्थित केला.  तसेच 6.नामदेव बांगर सर यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत यांचे रिटायर्ड शिक्षक  व कोरोना मध्ये मयत झालेल्या शिक्षकांच्या रिक्त पदी लवकरात लवकर  समायोजन करावे व विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेण्यात यावे या संबंधीचा प्रश्न उपस्थित केला. 7 श्री. धानके सर यांनी DPCS योजनेचे अनुदान व NPS मध्ये नाही याबाबत उचित कार्यवाही व्हावी या संबंधी चा प्रश्न उपस्थित केला.

 राष्ट्र सेवादल सानेगुरुजी बालभवन शाखा उद्घाटन 

 यानंतर विविध विभागांमध्ये राष्ट्रसेवा दल सानेगुरुजी बालभवन शाखांचे उद्घाटन करण्यात आले . या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक अर्जुन कोकाटे सर राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचा सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब यांनी परिचय करून दिला. त्यानंतर प्राध्यापक कोकाटे सर यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. सन्माननीय कपिल पाटील साहेब यांनी शिक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंबंधी मार्गदर्शन केले  व लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले 

तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत वित्त आयोगाला आदेशान्वित करण्यात आल्याचे सुचित केले.  वस्ती शाळांच्या शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कोव्हीड मध्ये मृत झालेल्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पदवीधर वेतनश्रेणी सरसकट लागू करण्यासंबंधीचे आश्वासन दिले. कोव्हीड मुळे शिक्षकांच्या पगारात कपात होणार नाही याचेही आश्वासन दिले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्या संबंधीची सूचना करण्यात आली. शिक्षकांना कॅशलेस योजना लागू करण्यासंबंधी आश्वासन दिले.

जिल्हा परिषद शाळा भगतपाडा , केंद्र अजनुप,बीट कसारा,ता.शहापूर,जि.ठाणे. मुख्याध्यापक श्री.सोमनाथ नवसू पारधी सदर शि‌क्षकांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना जानून बुजून दोन वर्ष मासिक वेतन देय अडविलेले आहे सदर शिक्षकासाठी शिक्षक आमदार मा.श्री.कपिल पाटील साहेब जि.प.ठाणे मा.मुख्यकार्यकारी साहेब, जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न मार्गी लावणार आहेत. तसेच  विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन साहेबांनी दिले.

Post a Comment

0 Comments