सानेगुरूजी बालभवन उद्घाटन सोहळा.
सन्मा.शिक्षक आमदार आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सानेगुरूजी बालभवन केंद्र गावागावात स्थापन करून वाचनाची गोडी निर्माण व्हावी व तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहचवण्यात आपण सर्व शिक्षकांनी बालभवन केंद्राची निर्मिती करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज कविता बूक स्टाॅल शहापूर यांच्या सौजन्याने आज जिल्हा परिषद शाळा पाषाणे केंद्र.खातिवली ता.शहापूर जि.ठाणे.येथे सौ.कविता विशे मॅडम यांच्या शुभहस्ते हा छोटेखानी बालभवन उद्घाटन सोहळा संपन्न झाला.श्री.जयवंतजी मोगरे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.उपस्थित सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
सानेगुरूजी बालभवनाठी श्री.रविंद्र विशे सर व सौ.कविता विशे मॅडम यांनी जवळपास सव्वाशे पुस्तके भेट दिली व अजून शाळेसाठी आर्थिक मदतीचा धनादेश देऊन एक आदर्श निर्माण केला.याबद्दल सर्वांनीच या परिवाराचे कौतुक केले.
सानेगुरूजी बालभवन केंद्र गावागावात होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.आम्ही सामाजिक काम करता करता कृषीक्षेत्रातही काम करत असून अनेक विद्यार्थ्यांना जे गरिब व गरजू आहेत अशा मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत असे श्री.सुरेश विशे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.ह.भ.प.कैलासजी निचिते महाराज यांनी वाचनातूनच आदर्श माणूस घडत असतो.यासाठी आमच्या शाळेला मिळालेल्या पुस्तकात आम्ही भर टाकणार असून गावात वाचनाची आवड निर्माण करू.पुस्तके भेट देणा-या विशे दाम्पत्याचे महाराजांनी विशेष कौतुक केले.योगगुरू पाषाणे शाळेतील शिक्षक श्री.अब्दुल शेख या शाळेत आल्यापासून शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला त्यास आमचे शिक्षक श्री.मधुकर जाधव सरांची व गावकरी यांची विशेष साथ मिळाली.
श्री.अब्दुल शेख सरांनी श्री.रविंद्र व परिवाराने आमच्या गावासाठी भरीव अशी मदत केली त्याबद्दल आभार व्यक्त करून या पुस्तकांचा निश्चितच चांगला उपयोग करू.
श्री.अरूण मडके सरांनी प्रत्येक शाळेत/गावात सानेगुरूजी बालभवनाची निर्मिती झाल्यास वाचनाची सवय गावकरी,विद्यार्थी यांना लागली तर त्याच्या ज्ञानाची व्याप्तीत वाढ होण्यास मदत होईल.
तरच सन्मा.कपिलजी पाटील साहेबांची संकल्पना सफल होईल.
श्री.विजयकुमार देसले सर यांनी वाचनाने माणसाच्या विचारात बदल होत असतो व माणसाच्या प्रगतीत भर पडते.श्री.सुरेश भाकरे सरांनी सानेगुरूजी बालभवन हे एक आदर्श केंद्र बनावे यासाठी शिक्षक म्हणून आपण प्रयत्न करूया व विद्यार्थ्यांना तसेच गावातील तरूणांना वाचनाची आवड निर्माण करूया. त्यानंतर श्री.मनोज गोंधळी सरांनी बालभवन उपक्रमाचे कौतुक करून आजची पिढीचे वाचन कमी होत चालले असून वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अशा बालभवन केंद्राची गरज असल्याचे मनोगतात मत व्यक्त केले.त्यानंतर केंद्रप्रमुख घनश्याम कांबळे सरांनी मोखाडा दुर्गम भागात काम करत आहोत तरीही रविंद्र विशे सर शाळेत विविध उपक्रम राबवत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठा बदल झालेला पाहावयास मिळत असून सरांचे विशेष कौतुक केले.
श्री.धनंजय धानके सरांनी वस्तीशाळेतील प्रत्येक शिक्षक हा सन्मा.कपिल पाटील साहेबांमुळेच आज सुखी जीवन जगत असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत असे मत व्यक्त केले.श्री.रविंद्र विशे सर यांनी बालभवनाची जी पुस्तके भेट दिलेली आहेत ती कविता बुक स्टॉलच्या मिळणा-या नफ्यातून दिलेली असून यापुढेही आम्ही सदैव मदत करत राहू.फक्त दिलेली पुस्तके यांचे नियमित वापर करावे व घराघरात पुस्तके पोहचवून वाचनाची आवड निर्माण व्हावी हा एकच उद्देश असून इतर गावातही आम्ही मदत करणार आहोत असे सांगितले.
याप्रसंगी शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.अरूणजी मडके सर,खातिवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.लक्ष्मीकांत परदेशी सर,ह.भ.प.कैलासजी निचिते महाराज,शिक्षक भारती संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेशची विशे सर, कार्याध्यक्ष श्री.सुरेशजी भाकरे सर, तालुकाध्यक्ष श्री.जयवंतजी मोगरे सर,कास्ट्राईब शहापूर तालुकाध्यक्ष श्री.मनोजजी गोंधळी सर,सूर्यमाळ केंद्राचे केंद्रप्रमुख घनश्याम कांबळे सर ,महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.विजयजी देसले सर ,श्री.धानके सर,सोमनाथ केकाण सर व पालक वर्ग उपस्थित होते.
सर्वांत शेवटी श्री.जयवंतजी मोगरे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सोहळ्याची सांगता केली.
धन्यवाद!
वाचाल तर,वाचाल.


0 Comments