राज्यव्यापी धरणे आंदोलन



 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती

राज्यव्यापी धरणे आंदोलन

सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021


ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकदिवशीय देशव्यापी आंदोलन करणार आहेत. शिक्षण बचाव मंच अंतर्गत झालेल्या विविध संघटनाच्या बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, सर्वांना जुनी पेन्शन योजना, विद्यार्थी, शिक्षक व जनता विरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी रु. २००० नेटपॅक भत्ता आणि मोफत मोबाईल अथवा टॅब द्या, अनुसूचित जाती - जमाती व गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक शैक्षणिक पॅकेज घोषित करा, इत्यादि मागण्यासाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलांनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय शिक्षक भारतीने घेतला आहे. 


सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी शिक्षक भारती संघटनेच्या सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी यांनी आपल्या विभागात शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण निरीक्षक अथवा शिक्षणाधिकारी कार्यालय येथे दुपारी २ ते ४ या वेळात धरणे आंदोलन करायचे आहे. आंदोलनाचे नियोजन आपल्या विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भारती संघटनेच्या सर्वांनी एकत्रितपणे करावे. सदर आंदोलनाची माहिती संबंधित क्षेत्रातील पोलीस ठाण्यात देण्यात यावी. तसेच संघटनेच्या लेटरहेड वर मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे. आंदोलांनापूर्वी व आंदोलनानंतर विविध प्रसार माध्यमावर प्रसिद्धी देण्यात यावी. निवेदन देतानाचे व आंदोलनाचे फोटो जिल्हाध्यक्ष ग्रुपवर पाठवावे. आंदोलन करताना कोविडचे सर्व निर्देश व नियम यांचे काटेकोरपणे पालन करावे. 


मागण्या


१) सन २००५ पूर्वी व नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.


२) वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा जोडण्यात यावी.


३) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती (१०, २०, ३०) योजनेचा लाभ इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना देण्यात यावा. तसेच ही योजना लागू होईपर्यंत शिक्षकांना वरीष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्यात यावी.


४) प्राथमिक पदवीधर /विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन देण्यात यावे. 


५) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ राबवावी. कोकण विभागाचा समावेश करावा. बदल्या १०० टक्के कराव्यात.


६ )जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी.ही बदली प्रक्रिया राबवत असता 

विस्थापित, रन्डमराऊन्ड मधील शिक्षक, महिला शिक्षिका ,एकल शिक्षक , पती पत्नी एकत्रित करण, दुर्गम भागातील शिक्षक यांचा प्राधान्याने विचार व्हावा.

विनंती बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून आणि सेवा ३वर्षे ग्राह्य धरण्यात यावे. 


७) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नयेत.

कोविड १९ च्या ड्युटी तून कार्यमुक्त करावे.

कोविड आजाराने बाधीत झालेल्या शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्यात याव्यात.

कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या शिक्षकांना विमाकवच ५०लाख रू रक्कम तात्काळ देण्यात यावी.


८)राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार 1तारखेस व्हावे यासाठी cmp प्रणाली सुरू करण्यात यावी.

९)Bds प्रणाली तात्काळ कार्यान्वित करण्यात येवून भविष्य निर्वाह निधी चे प्रस्ताव मंजूर करावेत.


१०) सावित्रीबाई फुले-फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना त्वरीत लागू करा.

वैद्यकीय प्रतीपूर्ती ची देयके निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद यांना अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.  


११) मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येवून मुख्याध्यापक,  केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांची  रिक्त पदे भरण्यात यावी.


१२) केंद्रप्रमुख  यांना १६५० प्रवास भत्ता  देण्यात यावा. ज्या जिल्ह्यात वसुली सुरू आहे ती 

वसुली तात्काळ थांबवावी


१३) सर्वच अभावीत केंद्र प्रमुख यांना कायम करण्यात यावे.


१४) केंद्र प्रमुख पद हे जिल्हा तांत्रिक सेवा गट क मध्ये समावेश करण्यात यावा. 


१५) जिल्हा परिषद अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना / वारसांना अनुकंपातत्वावर तात्काळ नियुक्ती देण्यात यावी.


१६) अप्रशिक्षित शिक्षकांची अप्रशिक्षित सेवा ग्राह धरून वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी.


१७) २० पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत.


१८) मुलींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ करुन प्रतिदिन १० रुपये करण्यात यावा.


१९) ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावा.


२०) आदिवासी व नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता विनाअट सुरू ठेवण्यात  यावा.


२१) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यात यावी.


२२) विकल्प विपरीत शिक्षकांना पालघर जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात विना अट सामावून घ्यावे.



आपले नम्र


शिक्षक भारती प्राथमिक शिक्षक संघटना , ठाणे जिल्हा 


Post a Comment

0 Comments